एक-दोन लोक नाही तर…”हे” अख्ख गावच सेक्सटॅार्शनच्या नावाखाली गंडा घालतंय

0
333

राजस्थान,दि.२२(पीसीबी) – काही दिवसांपूर्वी पुण्यात दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम वाडकर या विद्यार्थ्याने सेक्सटॉर्शनला बळी पडून आत्महत्या केली होती. पुण्यातच सेक्सटॉर्शनमुळे आणखी एका तरुणाने जीवन संपवलं. पुण्याप्रमाणेच देशभरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. मोबाईलवर तरुणींचे नग्न फोटो पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येचं प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आणि याचा तपास सुरु केला. ज्या मोबाईलवरुन या तरुणांना फोन करण्यात आले होते, त्याचा तपास सुरु केला असता त्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले.

राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील गोथरी गुरु गाव. गावात एकूण 560 घरं आणि प्रत्येक घराचा व्यवसाय एकच ॲानलाईन गंडा घालायचा. देशातले अनेक नावाजलेले उद्योजक, न्यायाधीश, वकील यांना या गावाने सेक्सटॅार्शनच्या नावाखाली गंडा घातलाय. रक्कम काही हजारातून सुरू होते ते अगदी लाखो रूपयांपर्यंत मागितली जाते.

पुण्यात घडलेल्या दोन आत्महत्यांचं कारण हेच गाव. गावातील घरं मातीची असली तरी त्यांचं जगणं ऐशोआरामाचं आहे. घरात टीव्ही, एसी, महागड्या चारचाकी गाड्या दिसतात. गावाबाहेर बसलेली तरूणींची टोळी गावात कुणी नवीन आल की सगळ्या गावाला अलर्ट करतात. अगदी जमतारा वेबसिरीज मध्ये घडतं तसंच. पुणे पोलिसांनी या गावात जाऊन वेषांतर करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्वर सुभान खान या आरोपीला अटक केली.

संपूर्ण गावच हा व्यवसाय करायला लागल्यावर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात. आरोपी पकडल्यावर जेव्हा त्याला ट्रांझिट रिमांडसाठी न्यायालयात नेल्यावर न्यायालायाने थेट चार दिवस रिमांड देत असा प्रकार त्यांच्या सोबतही घडल्याचं तपास पथकाला सांगितलं. ज्या रेल्वेने पोलीस पुण्यात परत आले त्या रेल्वेच्या टीसीला ही असाच गंडा घातल्याने त्याने पोलिसांना तातडीने बर्थ उपलब्ध करून दिल्या. प्रीती शर्मा किंवा प्रीत यादव या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून ही फसवणूक केली जायची, अशी माहिती तपास अधिकारी अक्षय सरोदे यांनी दिली.