एक किलो गांजासह 19 वर्षीय तरुणाला पिंपरीतून अटक

0
220

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – एक किलो गांजासह एका 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्य़ा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी येथील भाटनगर येथून अटक केली आहे.

फय्याज अली मोहम्मद अली (वय 19 रा.भोसरी) अया अटक आरपीचे नाव आहे.याप्रकरणी अमंली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगलीवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना बातमी मिळताच पोलिसांनी सापाळा रचून आरोपीला अटक केली. यावेली त्याच्याकडून 34 हजार 140 रुपयांचा 1 किलो 138 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तपासात तो बेकायदेशीर रित्या गांजा विक्री करण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी. पी.सी.एस अक्ट अतंर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.