एक्झिट पोल सांगतो, मुंबईत भाजप-शिंदे शिवसेना सत्तेत

0
3

दि. १५(पीसीबी)-महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वात मोठा एक्झिट पोल समोर आला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर ठाकरेंना मात्र जोरदार धक्का बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंना हा धक्का असेल.

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडलं. त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्या आधी या निकालाचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल समोर आले आहेत.

मुंबईचा एक्झिट पोल काय सांगतोय?
मुंबई महापालिकेसाठी जनमतचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 62 जागा मिळतील असं म्हटलंय.

दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी इतर पक्षांना 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
JVC एक्झिट पोलनुसार, मुंबईत भाजपची सत्ता येणार असून सर्वाधिक मतदान टक्काही त्या पक्षाला मिळणार आहे. या अंदाजानुसार कोणत्या पक्षाला जागा आणि किती टक्के मतदान मिळणार याची आकडेवारी खालीलप्रमाणे –

भाजप शिंदे – 138
ठाकरे- मनसे – 59
काँग्रेस-वंचित – 23
इतर – 7

मतांची टक्केवारी किती?
महायुती : 42-45%
शिवसेना ठाकरे- मनसे : 34-37%
काँग्रेस- वंचित : 13-15%
इतर : 6-8%

लोकशाही रुद्र रिसर्च एक्झिट पोल
त्याचवेळी लोकशाही आणि रुद्र रिसर्च यांच्याही एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला 121 जागा मिळतील. तर ठाकरेंच्या युतीला 71 जागा मिळतील. काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मुंबईत 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजप शिवसेना – 121
शिवसेना ठाकरे- मनसे – 71
काँग्रेस वंचित – 25

इतर – 10

अॅक्सिस माय इंडिया मुंबई एक्झिट पोल
भाजप शिंदे – 131- 151
ठाकरे- मनसे – 58-68
काँग्रेस-वंचित – 12-16
इतर – 6-12

मतदानाची टक्केवारी कशी?
भाजप शिंदे – 42
ठाकरे- मनसे – 32
काँग्रेस-वंचित – 13
इतर – 13

जेडीएस मुंबई एक्झिट पोल
भाजप शिंदे – 127-154
ठाकरे- मनसे – 44-64
काँग्रेस-वंचित – 16-25
इतर – 09-17