चिखली, दि.03 (पीसीबी)
एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून दोन गट एकमेकांसमोर आले. त्यांनी कोयत्याने एकमेकांवर वार केले. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १ जानेवारी रोजी रात्री पाटीलनगर, चिखली येथे घडली.
स्वप्नील बाळासाहेब राक्षे (वय २६, रा. चिखली) याने दिलेल्या फिर्यादीनुसार ऋषिकेश उर्फ सोन्या बाळासाहेब चव्हाण, लखन शेख, नितेश तुपे, साहिल गायकवाड (वय १८, रा. चिखली), इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून ‘आम्ही इथले दादा आहोत’ असे म्हणत कोयत्याने स्वप्नील आणि त्यांच्या मित्रांवर वार करून जखमी केले.
याच्या परस्पर विरोधात साहिल मानुज गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील राक्षे, वैभव कृष्णा पाटील (वय २२, रा. तळवडे), रवी प्रदीप सुरवसे (वय २९, रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मी इथला भाई आहे. तुला ठार मारतो’ असे म्हणत साहिल आणि त्यांच्या मित्रांवर कोयत्याने वार करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.