एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून वृद्धास बेदम मारहाण

0
216

भोसरी, दि. १२ (पीसीबी)- एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून एका तरुणाने वृद्धास बेदम मारहाण केली. ही घटना 9 जानेवारी रोजी सकाळी भोसरी येथे घडली.

गणपत किसन इघे (वय 59, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन अनिल विश्वकर्मा (वय 20, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर वॉकिंग करीत होते. त्यावेळी आरोपीने त्यांना ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस’ असे म्हटले. त्यावरून फिर्यादी यांनी ‘मी कुठे तुझ्याकडे बघतो’ असे म्हटले. त्यावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांना मारहाण करत रत्यावर आपटले. त्यात ते गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.