एकनाथ शिंदे यांच्या विसर्जनाची तयारी सुरु, तर मंत्री मंडळ विस्तार होणार नाही आणि तो भाजप होऊ देणार नाही.- विनायक राऊत

0
292

पिंपरी, दि. २४ (पीसीबी): एकनाथ शिंदे गटाने कितीही पोपटपंची केली तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही.उलट एकनाथ शिंदे यांचे विसर्जन होणार अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज शिंदे गटातील आमदार आमच्या अजुनही संपर्कात आहेत. मात्र त्यांच्यासाठी अजूनही उद्धव ठाकरे यांनी परतीच दारे उघडली नसल्याचेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात आज भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आल होत. या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे विधान परिषद आमदार सचिन अहिर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी कुणी कितीही एकत्र आले तरी महाविकास आघाडी प्रत्येक निवडणुकीत जिंकलेच असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.