एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला पुन्हा जोरदार धक्का

0
320

– आज शिवसेनेचे २ खासदार, ५ आमदार सुध्दा करणार शिंदे गटात प्रवेश
मुंबई, दि. ५ (पीसीबी) : ठाकरे आणि शिंदे गटांच्या आजच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. ठाकरे समर्थक आणि शिंदे गटाचे समर्थक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी राज्यातून रवाना होत आहे. शेकडोंच्या संख्ये शिंदे गटाचे समर्थक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक मुंबईत येत आहे. आजच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे असं काय करणार? याची उत्सुकता लागली होती. आता शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी गौप्यस्फोट केला आहे. दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

मुंबईत शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आज होणार आहे. तर मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची पूर्ण तयारी झाल्याचं बोललं जातंय. दसऱ्याच्या मुहूर्तावर २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. कृपाल तुमाने हे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी कृपाल तुमाने हा दावा केला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात हे खासदार आणि आमदार प्रवेश करणार आहेत.