एकनाथ शिंदे प्रचारासाठी आल्यास.. काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करणार- सचिन काळभोर

0
345

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) : गेल्या कित्येक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथील शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आलेला नाही. या मागणीसाठी अनेकदा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. राज्य सरकारने गेल्या अधिवेशनात 15 दिवसांत हा साडेबारा टक्क्यांचा प्रश्न मार्गी लावू असे जाहीर केले होते. मात्र अद्याप यावर काहीच उपाययोजना किंवा अंमलबजावणी झालेली नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा संदर्भात राज्य सरकारने गाजर दाखविले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. त्यांना काळे झेंडे दाखवून, त्यांचा जाहिर निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयास इमेलद्वारे कळविण्यात आल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नाही. अधिवेशनात १५ दिवसांत साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा येणार म्हणून घोषणा करण्यात आली होती शेतकरी बांधवांना गेल्या ४६ वर्षांपासून साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे त्याचा पाठपुरावा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते.

तसेच मोर्चा, आंदोलन करण्यात आले होते. तरीही साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आलेला नाही. म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी स्पष्ट केले.