एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री

0
37

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीतल दणदणीत विजयानंतर महायुती आता सत्तास्थापनेच्या कामाला लागली आहे. त्या दृष्टीने महायुतीच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींनाही वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे आज विधानसभेचा कार्यकाल संपत असल्याने एकनाथ शिंदे सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. लाडक्या बहिणींच्या उपस्थित शिंदे राजीनामा देणार आहेत.

नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन एकनाथ शिंदेंना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी देतील, त्यामुळे एकनाथ शिंदेंच राज्याचा कारभार पाहतील. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील राजीनामा देणार आहेत.