मुंबई, दि. २९ : नुकताच संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्याबद्दल मोठा खुलासा केलाय. संजय राऊत म्हणाले की, माझे आणि कुणाल कामराचे कालच बोलणे झाले. कुणाल कामरा हा अल कायदाचा दहशतवादी आहे का? तो कलाकार आहे, म्हणून मी त्याच्या संपर्कात आहे. मी त्याला स्पष्ट सांगितले की, कायद्याला सामोरं जायला हवं. मुळात म्हणजे कामरा प्रकरणात अजित पवारांची वेगळी भूमिका आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे अजित पवार हे कात्रीत सापडले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, व्यंगात्मक टीकेनंतर सरकारने किंवा राजकारण्यांनी इतके असवस्थ होण्याचे कारण नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. अशाप्रकारे गुन्हे दाखल करणे, दहशत निर्माण करणे, धमक्या देणे हे योग्य नसल्याचे न्यायालयाने जे मत व्यक्त केलंय ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी खास करून मुख्यमंत्र्यांनी बघावे. कुणाल कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागा असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी कायद्याच्या पलिकडे जाऊन दिला.
एकनाथ शिंदेंच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली त्यांनी हा न्यायालयाचा निकाल काळजीपूर्वक पाहिला पाहिजे. अजित पवारांना हे सर्व मान्य दिसत नाहीये, त्यांची भूमिका आणि भाषा वेगळी आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, माझे आणि कुणाल कामराचे कालच बोलणे झाले आहे. मी कायद्याला सामोरे जाण्याचे त्याला सांगितले आहे.