एकनाथ शिंदेच्या भेटिला पिंपरी चिंचवडचे बडे नेते

0
3

– शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड

पिंपरी, दि. २१ (पीसीबी)  – आगामी महापालिका निवडणुकित महाविकास आघाडीतील तीनही घटकपक्षांची नौका बुडणार की काय अशी भिती असल्याने इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकिला ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केले होते त्यापैकी अनेकजण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. सर्वात धक्कादायक राजकीय घडामोड म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आलेले २०-२२ माजी नगरसेवक आता पुन्हा दादांना शरण जायच्या तयारीत होते. दरम्यानच्या काळात यापैकी काही बडे नेते खासदार श्रीरंग बारणे यांच्या समवेत मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या पंधरी दिवसांत सलग दोनदा भेटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
साधारणतः एप्रिल महिन्याच्या मध्यावर महापालिका निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत. आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. भाजपने सर्व १२८ जागा लढवून १०० जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे म्हणून अनेकांचा भाजपकडे ओढा आहे. आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे याच्याकडे आपली डाळ शिजणार नाही म्हणून भाजप सोडून दुसरा तगडा पर्याय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे पाहिले जाते. अजितदादा पुन्हा शहरात बस्तान बसविण्यासाठी ताकद लावत असल्याने त्यांनी स्वतः जुन्या साथीदारांना साद घातली आहे. भाजपमध्ये संधी मिळणार नाही म्हणून अनेकजण अजितदादांकडे डोळे लावून बसलेत.

शिंदेंचा ताकद वाढविण्याचा प्रयत्न –
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना या शहरात आपले बस्तान बसविण्यासाठी कामाला लागली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यासाठी मोर्चेबांधनी सुरू केली असून त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्यात. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या निष्ठावंतांचा एक मोठा गट जो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेला होता तो गळाला लागतो का असा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत अभ्यासू चेहरा, तटस्थ, निःपक्ष म्हणून ख्याती असलेला नेता आणि त्यांचे आठ-दहा सहकारी दोन वेळा एकनाथ शिंदे यांना भेटले. खासदार बारणे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. शिंदेंच्या शिवसेनेत हे सर्वजण एकत्रित प्रवेश कऱणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासाऱख्या पसरल्याने खळबळ उडाली आहे. शिष्टमंडळात शिंदे यांना भेटायला गेलेल्या एका माजी नगरसेवकाने या माहितीला दुजोरा दिला.
एकनाथ पवार, मोरेश्वर भोंडवे स्वगृही –
भाजपची सत्ता असताना महापालिकेत पाच वर्षे सत्ताधारी नेतेपदावर असलेले एकनाथ पवार हे तीन महिन्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते. लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी तसेच शिवसेनेचे राज्य संघटक म्हणून त्यांना पद देण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक ओळीचे पत्र देत शिवसेनेला रामराम ठोकला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले रावेत भागातील बलाढ्य नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हेसुध्दा पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत परतले.