एकनाथ पवार यांना नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी

0
3

पिंपरी, दि. 23 (पीसीबी) : महाआघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने ३५ उमेदवारांना उध्दव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने एबी फॉर्म दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी सत्ताधारी नेते आणि शिवसेनेचे संघटक एकनाथ पवार यांना नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तीन वर्षांपासून या मतदारसंघात पवार यांनी जोरदार तयारी केली. भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले पवार यांनी आपण आमदार होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

शहरात सलग २५ वर्षे भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून एकनाथ पवार यांनी काम केले. महापालिकेत दोन वेळा नगरसेवक झाले. भोसरी विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये त्यांनी भाजपकडून पवार यांनी कडवी झुंज दिली होती. पवार यांना तब्बल ४५ हजार मते मिळाली होती. भाजपचे दिवंगत नेते अंकुश लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून पक्ष वाढविण्यात पवार यांचे मोठे योगदान आहे. शहरातील गावकी भावकीच्या राजकारणात आपली डाळ शिजणार नाही, असे लक्षात आल्याने त्यांनी आपल्या गावाकडे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार तालुक्यात तळ ठोकला. गावोगावी फिरून समस्या जाणून घेतल्या आणि संपूर्ण मतदारसंघात पायपीट करत संपर्क अभियान राबविले.