एकनाथ खडसेंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये मुलींचे 1497 नग्न फोटो, रुपाली चाकणकरांचा गौप्यस्फोट, परराज्यातून मुलींना बोलावून लैंगिक शोषण?

0
3

पुणे, दि. ७ (पीसीबी) – माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर पुरते गोत्यात अडकलेत. खराडीतील ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या खेवलकरांच्या मोबाईलमधील काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाशच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलाय.

देशातलं हे सर्वात मोठं रॅकेट असल्याचा दावाही रुपाली चाकणकर यांनी केला आहे. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये १४९७ नग्न फोटो आणि अनेक अश्लील व्हिडीओ असल्याचा आरोप त्यांनी केलाय. घरातील मोलकरणीचेही अश्लील फोटो असल्याचं चाकणकर यांचं म्हणणंय. हे सर्वात मोठं सेक्स रॅकेट असल्याचं त्यांचं म्हणणंय.

महिला तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

खेवलकरांच्या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये मुलींचे 1497 नग्न, अर्धनग्न फोटो सापडले. याच मोबाईलमध्ये मुलींसोबतचे 252 अश्लील व्हिडिओही सापडले, त्यात खेवलकर स्वतः दिसतोय. सिनेमात काम देण्याचं आमीष दाखवून परराज्यातून मुलींची तस्करी करण्यात आली. त्यांना विवस्त्र करून लैंगिक अत्याचार केले, नंतर ब्लॅकमेलही केलं
7 मुलींसोबतचे आपत्तीजनक व्हॉट्सअॅप चॅटही सापडले.

आरुष नावाचा माणूस मुली सप्लाय करायला ठेवला होता. खराडी, गोवा, लोणावळा, साकीनाका, जळगावच्या हॉलेचात मुलींसोबत पार्ट्या झाल्या. एवढंच काय तर घरातल्या मोलकरणीचेही वाईट फोटो मोबाईलमध्ये आढळले
असा खेवलकरांच्या कारनाम्यांचा पाढाच रुपाली चाकणकर यांनी वाचलाय.
सर्वात मोठ्या रॅकेटची शक्यता

महिलांच्या तस्करीचं हे देशातलं सर्वात मोठं रॅकेट असू शकतं. त्यामुळं या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, असं पत्र राज्य महिला आयोगानं पोलीस महासंचालकांना पाठवलंय, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पुण्याच्या खरडी मधील स्टे बर्ड हॉटेलवर पोलिसांनी 27 जुलैला छापा घालून प्रांजल खेवलकर आणि त्याच्या साथीदारांना रेव्ह पार्टी करताना अटक केली. आता तर खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय काय सापडलं, याचा तपशीलच महिला आयोगानं जाहीर केलाय.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडांचा नातू आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला अलिकडेच मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली. खेवलकरांचे हे कारनामे खरे असतील तर ते देखील प्रज्ज्वल रेवण्णाच्याच वाटेवर आहेत का, अशी चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली आहे.