एकतर्फी प्रेमातून हिंजवडी येथील तरुणीवर तिघांनी मिळून कोयत्याने वार केले. तरुणीवर झालेल्या हल्याबाबत पोलिस तपास सुरू असून तिघांना अटक केली आहे.
हल्ला झालेल्या मुलीचे नाव प्राची रतन साळवे (वय – १८) रा फुले नगर, नाशिक रोड, नाशिक सद्या रा. साखरे वस्ती हिंजवडी हिच्यावर प्रेम प्रकरणातून योगेश भालेराव (वय २१ वर्षे) रा. कासारसाई याने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने सव्वाचार वाजाण्याच्या सुमारास येस बँकेच्या मागे, शेल पेट्रोल पम्प जवळ, हिंजवडी येथे कोयत्याने डोक्यावर, मानेवर हातावर वार करून गंभीर जखमी केले आहे.
सद्या जखमी मुलीवर हिंजवडी हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.
मुख्य आरोपी योगेश भालेराव (वय – २५), प्रेम लक्ष्मण वाघमारे (वय – २०), अल्पवयीन बालक असे सर्व आरोपी ताब्यात आहेत.












































