एकच फ्लॅट दोघांना विकून फसवणूक

0
270

सांगवी, दि. १७ (पीसीबी) – एकच फ्लॅट दोघांना विकला. तसेच फायनान्स कंपनीकडून फ्लॅटसाठी घेतलेले कर्ज फेडले नाही. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१७ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.

ऋतुराज विलास सूर्यवंशी (रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यवंशी याने दत्तनगर, वाकड येथील सिद्धिविनायक सोसायटीमधील एक फ्लॅट फिर्यादी यांना विकला. त्यानंतर आरोपीने तोच फ्लॅट प्रतीक विवेक वैद्य आणि नेहा वैद्य यांना विकला असल्याचे दाखवून त्यावर आवास स्मॉल फायनान्स, शाखा हडपसर येथून १४ लाख ११ हजार ८४५ रुपये कर्ज घेतले. दरम्यान फिर्यादी यांना मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने राहत्या फ्लॅटवर कर्ज घेण्यासाठी चौकशी केली असता त्यांच्या फ्लॅटवर पूर्वीचेच कर्ज थकले असल्याचे निदर्शनास आले. आरोपीने कर्ज काढून ते न भरता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.