एकच जागा दोघांना विकून फसवणूक…

0
256

पिंपरी,दि.११(पीसीबी) – एकच जागा दोघांना विकून वृद्धाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार भोसरी येथे घडला आहे. याप्रकरणी 74 वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. प्रकाश सिताराम चौकडे (वय 74, रा. कासारवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.

तक्रारदार प्रकाश चौकडे यांनी पांडुरंग सिताराम चौकडे यांच्याकडून भोसरी गावातील 1150 चौरस फूट जागा आणि त्यावरील खोल्या खरेदी केल्या. या व्यवहाराबाबत दस्त नोंदणी केल्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित जागेत बांधकाम केले.

तक्रारदारांसोबत व्यवहार करण्यापूर्वी पांडुरंग चौकडे यांनी पुरुषोत्तम चौकडे यांना संबंधित जागेचा अर्धा भाग विकला आहे. त्याबाबतचे खरेदी दस्त हवेली नंबर 5 यांच्याकडे नोंदविण्यात आले आहे. तसेच चूक दुरुस्ती दस्त देखील नोंदविण्यात आले आहे. चूक दुरुस्ती दस्त नोंदविल्यानंतर तक्रारदार यांचे खरेदीखत झाले आहे.

तक्रारदार यांना सदर जागेचे विकसन करायचे असल्याने त्यांनी मिळकतीचा शोध अहवाल बनविण्यासाठी शोध घेतला असता संबंधित जागेचा अर्धा भाग यापूर्वीच अनुराधा पुरुषोत्तम चौकडे यांना विक्री केल्याचे उघडकीस आले. याबाबत तक्रारदार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार भोसरी पोलिसांकडे दिली आहे.