ऍमेझॉन कंपनीत दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना अटक

0
325

तळेगाव दाभाडे, दि. १६ (पीसीबी) – वराळे गावच्या हद्दीत असलेल्या ऍमेझॉन कंपनीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव महाळुंगे पोलिसांनी उधळून लावला. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री घडली.

सागर राहुल राठोड (वय 20), महेश कान्हा राजपूत (वय 19, दोघे रा. भोसरी) यांना अटक केली आहे. त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार आणि भीष्मा उर्फ झिंगरु शंकर राठोड (रा. कुरकुंडीगाव, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई राजेंद्र खेडकर यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील वराळे गावच्या हद्दीत ऍमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे मोठे कार्यालय आहे. इथे मोठ्या प्रमाणात सामानाची नेआण केली जाते. या कंपनीवर दरोडा टाकण्याची आरोपींनी तयारी केली. रविवारी रात्री उशिरा ते कंपनीत दरोडा टाकणार होते. याबाबत महाळुंगे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून सागर आणि महेश या दोघांना अटक केली. मात्र त्यांचे साथीदार पळून गेले. आरोपींकडून लोखंडी रॉड, कटावणी, कोयता, दुचाकी, पाईप अशी घातक हत्यारे जपत केली आहे. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.