उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरून एकास मारहाण

0
456

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – उसने पैसे परत न केल्याच्या तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) दुपारी लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

सुभाष कापसे, सचिन कापसे (रा. लिंक रोड, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष मधुकर शिरसाठ (वय 37, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष हे त्यांच्या मित्रांसोबत लिंकरोडवर गणपती मंदिराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या सुभाष कापसे याने संतोष यांना उसने पैसे परत न केल्याच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. संतोष यांनी आरडाओरडा केला असता सुभाष याचा मुलगा सचिन तिथे बियरची बाटली घेऊन आला. त्याने संतोष यांना शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.