उसने दिलेले पैसे मागितल्याने गोळ्या घालण्याची धमकी

0
220

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – उसने दिलेले पैसे परत मागितल्याने पैसे देण्यास नकार दिला. तसेच पैसे मागणाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत बावधन येथे घडली.

विलास दगडु चव्हाण (वय 37, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय दीपक धनवे (रा. कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांनी आरोपी अक्षय याला वेगवेगळ्या कारणांसाठी उसने 15 लाख 63 हजार रुपये दिले. तसेच फिर्यादी आरोपीने घेतलेले कर्जाचे हप्ते भर असल्याने कर्जाचे 25 हप्ते राहिले आहेत. अक्षय याने घेतलेले पैसे चव्हाण यांनी मागितले. ते पैसे देणार नसून तुला काय करायचे ते कर. तुला दुकान सुरू करू देणार नाही. गोळ्या घालीन अशी अक्षय याने धमकी दिली. चव्हाण यांच्या दुकानाची बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे ते दुकान आरोपीचे असल्याचे त्याने भासवत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.