उसने दिलेले पैसे मागितले म्हणून मजूरला दगडाने मारहाण, आरोपी अटकेत

0
270

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – दिलेले उसने पैसे मागितले अशता एका मजुराला दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना 7 जानेवारी रोजी चिचंवड येथील भोंडवे वस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी राजू पंडित हजारे (वय 42 रा. चिंचवड) यांनी सोमवारी (दि.12) फिर्याद दिली आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी अभिषेक रणजित कसबे (रा. चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांनी आरोपीले उसने पैसे दिले होते. ते पैसे परत मागण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्याशी वाद गालत फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.यावरून चिंचवड पोलिसांनी आरोपीला आटक केली आहे.. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.