उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला उचलून आपटले

0
166

दि २६ मे (पीसीबी ) – मित्राला उसने दिलेले एक हजार रुपये परत मागितल्याने मित्राने पैसे मागणाऱ्या मित्राला उचलून जमिनीवर आपटले. यात तरुणाला खांद्याला तसेच डोक्याला दुखापत झाली. ही घटना खेड तालुक्यातील बिरदवडी येथे गुरुवारी (दि. 23) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.

देवानंद बाबासाहेब साळवे (वय 23, रा. दवणे वस्ती, आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमाअयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम भगवान साळवे (वय 25, रा. बिरवदडी, ता. खेड, मूळगाव गोळेगाव माथा, ता. औढा, जि. हिंगोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवानंद यांनी त्यांचा मित्र शुभम साळवे यास उसने एक हजार रुपये दिले होते. ते परत मागण्यासाठी देवानंद हे शुभम याच्याकडे गेले. त्यावेळी शुभमला त्याचा राग आला. त्यातून त्याने त्याच्या खोलीतून बाहेर येऊन फिर्यादी देवानंद यांना उचलून खाली जमिनीवर आपटले. यात देवानंद यांना खांद्याजवळ तसेच डोक्यास दुखापत झाली. त्यानंतर शुभम याने त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा मारण्याची धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.