उसने दिलेले पैसे परत न दिल्याने तरुणाची आत्महत्या

0
65

चाकण, दि. 23 (पीसीबी) : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला दमदाटी करत मारहाण केली. पैसे परत देत नसल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 12 जुलै रोजी खेड तालुक्यातील बिरदवडी येथे घडली.

अकलेन्द्र पुष्पेन्द्र रघुवंशी (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पुष्पेन्द्र गुलाबसिंग रघुवंशी (वय 52, रा. मध्य प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मराजसिंग रघुवंशी, सत्येंद्रसिंग रघुवंशी (दोघे रा. मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अकलेन्द्र याने फिर्यादीस फोन करून सांगितले की, त्याने धर्मराजसिंग रघुवंशी याला एक लाख 57 हजार रुपये आणि सत्येंद्रसिंग रघुवंशी याला 26 हजार 816 रुपये दिले आहेत. ते पैसे परत मागितल्याने त्या दोघांनी अकलेन्द्र याला मारहाण करून दमदाटी व शिवीगाळ केली. या कारणावरून अकलेंद्र याने राहत्या घरात पंख्याच्या हुकाला गळफास लावून घेतला त्यास पोलीस, घरमालक आणि आरोपींनी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.