दि. 09 (पीसीबी) – १२५ हून अधिक सहभागींनी प्राचीन मार्शल आर्ट परंपरा आणि कौशल्याच्या नेत्रदीपक प्रदर्शनात साजरी केली
पिपंरी, ९ डिसेंबर २०२४: उषा इंटरनॅशनल या भारतातील ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगामधील आघाडीच्या कंपनीने स्वतंत्र वीर सावरकर भवन, निगडी येथे महाराष्ट्रातील उषा मर्दानी खेळ राज्य-स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था, पिंपरी सोबत सहयोग केला. या इव्हेण्टमध्ये १२ समूहांमधील १२५ हून अधिक मार्शल आर्टिस्ट्सनी जुना पारंपारिक मार्शल आर्ट ‘मर्दानी खेळ’सोबत महाराष्ट्रातील समृद्ध संस्कृतीला दाखवले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक विजेते आणि मर्लिन पुरस्कार जिंकणारे पहिले पोलीस कर्मचारी सुभाष दगडखैर आणि तुळजाभवानी मर्दानी खेल शिक्षण व्ही सांस्कृतिक सेवा संस्था, पुणे यांचे संचालक श्री नितीन दादा लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री शिवाजी स्मारक मंडळ, महाराष्ट्राचे सदस्य सुधीर थोरात, इतिहास प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, लोणावळा येथील उद्योगपती सुरेश तापकीर डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे नीलेश जाधव आणि तानाजी मालुसरे यांचे वंशज श्री कुणालजी मालुसरे सह अन्यमान्यवर उपस्थित होते तसेच त्यांनी बक्षीस वितरण समारोहाचे अध्यक्षस्थान देखील भूषवले. विजेते व उपविजेत्यांना शील्ड्स (ढाल) आणि पदकांसह सन्मानित सन्मानित करण्यात आले, तर सर्व सहभागींना परंपरा कायम ठेवण्यासाठी त्यांच्या योगदानाकरिता प्रमाणपत्रे देण्यात आली. अधिक उत्साहाची भर करण्यासाठी लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले, जेथे विजेत्याला उषाकडून स्पेशल गिफ्टसह गौरविण्यात आले.
सर्वसमावेशकता व संस्कृती जपत महिला व पुरूषांनी अनुक्रमे त्यांच्या पारंपारिक नऊवारी साड्या आणि मांडचोल अंगरखा परिधान केला, तसेच विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर करत आक्षेपार्ह व बचावात्मक लढाऊ कौशल्यांमधील प्रभुत्व देखील दाखवले. या इव्हेण्टची खासियत प्राचीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन ठरले, जेथे स्वयंसेवकांनी मर्दानी खेळामध्ये वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे जसे दंड-पट्टा, भाला, विटा व वाघनखे यांच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत माहिती सांगितली आणि त्यांच्या संपन्न वारसाचा अनुभव दिला.
याप्रसंगी मत व्यक्त करत उषा इंटरनॅशनल येथील स्पोर्ट्स इनिशिएटिव्ह्ज अँड असोसिएशन्सच्या प्रमुख कोमल मेहरा म्हणाल्या, “वर्षानुवर्षे तळागाळातील सहयोगात्मक प्रयत्नांमुळे मर्दानी खेळामध्ये उदयोन्मुख सुधारणा दिसण्यात आल्या आहेत, जेथे महाराष्ट्रामध्ये तालिमी (प्रशिक्षण केंद्रे) उदयास येत आहेत. यामधून या उपक्रमांचा वाढता प्रभाव दिसून येतो. या पारंपारिक मार्शल आर्टसाठी अपवादात्मक शारीरिक फिटनेस आणि कंडिशनिंगची गरज असते, ज्यामुळे हा खेळ अत्यंत शिस्तबद्ध आहे, जो स्थिरता आणि स्वास्थ्य उत्तम ठेवण्याला चालना देतो. मर्दानी खेळ सारख्या पारंपारिक क्रीडांना पाठिंबा देणे हे सक्रिय राहणीमानाला प्रेरित करणे, स्वास्थ्य उत्तम ठेवण्याला चालना देणे आणि भारताच्या संपन्न सांस्कृतिक वारसाचे जतन करणे याप्रती उषाच्या मिशनशी परिपूर्णपणे संलग्न आहे.”
मर्दानी खेळ पारंपारिक मार्शल आर्ट आहे, जे १५०० वर्षांपूर्वी डेक्कन प्रांतामध्ये उदयास आले आणि मराठा साम्राज्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात महत्त्व मिळाले, जेथे प्रांताच्या संरक्षण धोरणांमध्ये मार्शल आर्टने महत्त्वाची भूमिका बजावली. एकेकाळी मराठ्यांच्या लष्करी धोरणाचा महत्त्वपूर्ण पैलू राहिलेल्या मार्शल आर्टचे सांस्कृतिक महत्त्व कायम आहे. पुणे, कोल्हापूर व मुंबई येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले जाते.
उषा इंटरनॅशनलचा मर्दानी खेळासाठी पाठिंबा संपूर्ण भारतात क्रीडाला चालना देण्याच्या त्यांच्या व्यापक कटिबद्धतेचा भाग आहे. ब्रँड देशभरातील सर्वसमावेशक क्रीडा व उपक्रमांचा दृढ समर्थक देखील आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स सारख्या संस्थांसोबतचे सहयोग, तसेच अल्टिमेट फ्लाइंग डिस्क, फूटबॉल, गोल्फ आणि विकलांग अॅथलीट्ससाठी क्रिकेट अशा क्रीडांसाठी पाठिंब्याचा समावेश आहे. उषा दृष्टिहीन व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आलेल्या क्रीडांना देखील पाठिंबा देते, जसे अॅथलीट्स, कबड्डी, ज्युडो व पॉवरलिफ्टिंग. तसेच ब्रँड मल्लखांब, सियात खनम, छिंज, साझ-लाऊंग, दाह फँग, थांग-ता, तुराई कार, कलरीपयट्टू, सतोलिया, सिलंबम, योग आणि गटका यांसारख्या पांरपारिक भारतीय क्रीडांना नवसंजीवनी देण्यामध्ये अग्रस्थानी आहे, यामधून क्रीडामध्ये सर्वसमावेशकतेला चालना देण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.