उलटा चोर कोतवाल को डाटे” – रविकांत वरपे

0
282

>> छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याची भाजप -आरएसएसची जुनी परंपराच

मुंबई, दि. २ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अजितदादा पवारांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असे विधान केले. या विधानाशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहमत आहे. स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले आहे. परंतु संघ-भाजपला छत्रपती संभाजी महाराजांविषयी किती आकस आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी म्हटले आहे.

विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे विधान केले त्यावर भाजपने प्रदेश पातळीवर तुफान हल्ले सुरू केले आहेत. पुणे, औरंगाबाद येथे पवार यांच्या विरोधात आंदोलन कऱण्यात आले. आता भाजप ला रविकांत वरपे यांनी चोख उत्तर दिले आहे.

ते म्हणतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवळकर यांनी लिहलेल्या ‘बंच ऑफ थॉट’ या त्यांच्या पुस्तकात पान क्रमांक 223 वरती संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि दारुडे होते असा उल्लेख केलेला आहे. तसेच सावरकर आणि रामदास स्वामींनी अपशब्द काढलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने अजितदादांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा आरएसएसच्या मुख्यालयावरती मोर्चा काढावा आणि गोलवळकरांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाची होळी करावी आणि सावरकर आणि रामदास स्वामी यांचा निषेध व्यक्त करावा तरच आम्ही समजू की यांच छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे हे खरं प्रेम आहे.

जो आरएसएसचा काळा इतिहास आहे त्याला भाजप लपवू शकत नाही.
ज्यावेळी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीमाई फुले यांचा अपमान केला,त्यावेळी भाजपचे नेते कोणत्या बिळात लपून बसले होते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी अजितदादा पवारांनी घेतलेली भूमिका ही योग्य आणि सर्वसमावेशक आहे हेच खरे आहे.