उमेश पाल हत्याकांडातील आरोपींची गोळी मारून हत्या

0
198

प्रयागराज, दि. १६ (पीसीबी) – उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली.

दोघांचीही वैद्यकीय चाचणी करायची होती, त्यासाठी त्यांना प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलं होतं. या दोघा भावांना मेडिकल कॉलेजच्या इथं आणलं, तेव्हा दबा धरून बसलेल्या तिघांनी या दोन्ही भावांवर गोळ्या झाडल्या. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी या तिन्ही हल्लेखोरांना अटक केलीये.

यानंतर संपूर्ण यूपीत कलम 144 लागू करण्यात आलंय. प्रयागराजमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं इंटरनेट सेवा देखील बंद केली आहे. ज्या प्रयागराज जिल्ह्यात ही हत्या झाली, तिथं हाय अलर्ट असून रॅपिड अॅक्शन फोर्ससह (RAF) अतिरिक्त फौजा जवळपासच्या जिल्ह्यांत तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही वृत्त आहे. घटनास्थळी पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई करत 17 पोलिसांचं निलंबन केलं आहे.