उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये उसळली बंडखोरी

0
35

हरियाणा, दि. ५ –
निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांकडून तेथील उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत. भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी 67 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे.

67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
भाजपने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच पक्षात जणू राजीनाम्याची लाटच आली आहे. हरियाणा भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला मोठे झटके बसले आहेत. निवडणुकीसाठी बुधवारी पहिली यादी जाहीर झाली.

भाजपमध्ये मोठी बंडखोरी
हरियाणा बीजेपी ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनी भाजपच्या सर्वपदांचा राजीनामा दिला आहे. इंद्री विधानसभा मतदारसंघातून तिकीट कापल्याने कंबोज पक्षावर नाराज होते. त्यांनी पक्षावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सर्वपदांचा राजीनामा दिलाय.
हिसारमधून नेते दर्शन गिरी महाराज यांनी भाजपामधून राजीनामा दिलाय. भाजपचे वरिष्ठ नेत्री सीमा गैबीपुर यांनी पक्षाच्या सर्वपदांचा तात्काळ राजीनामा दिलाय.
जेजेपीमधून भाजपत प्रवेश करणारे माजी मंत्री अनूप धानक यांना उकलानामधून भाजपने तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेले भाजप नेते शमशेर गिल यांनी राजीनामा दिला.
सोनीपतमधुन भाजप युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनी राजीनामा दिलाय.