उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली

0
273

पिंपरी, दि. ०८ (पीसीबी) – गृह विभागाने गुरुवारी (दि. 7) सहायक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सचिन हिरे यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली करण्यात आली आहे.

सचिन प्रकाश हिरे हे धुळे येथे शिरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथील पोलीस उप अधीक्षक संजय भास्कर नाईक यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांची पदोन्नतीने राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे अपर उप आयुक्त (एटप) पदी पदस्थापना करण्यात आली आहे.

राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विजयसिंह रामचंद्र भोसले यांची ठाणे शहरातून बृहन्मुंबई पोलीस दलात बदली झाली आहे. तर परभणी मधील जिंतूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे यांची रायगड येथे पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) येथे बदली करण्यात आली आहे.