उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार टाळ वाजवत रमले बालगोपाळांच्या दिंडीमध्ये…!

0
90

बालेवाडी, दि. १७ ऑगस्ट (पीसीबी) –  महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज बालेवाडी मध्ये लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती संदर्भात पुण्यातील बालेवाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा आले असता लहानग्या बालगोपाळ वारकऱ्यांची दिंडी या कार्यक्रमाला उपस्थित होती. दरम्यान दादांनाही या छोट्या वारकऱ्यांसोबत टाळ वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे अजितदादांनी लहान मुलांच्या सोबत थोडा वेळ टाळ वाजवत त्यांच्या दिंडीचे कौतुक केले.