उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय अटके विरोधात ‘आप’ची निगडी येथे निदर्शने आंदोलन

0
264

ईडी-सीबीआय ही भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्री आहेत- आपचे हरिभाऊ राठोड यांचा आरोप

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड:आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडतर्फे दि. २७ फेब्रू रोजी सायं ५ वाजता आप नेते मनिष सिसोदियांच्या अटकेविरोधात टिळक चौक निगडी येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. भाजपकडून सूडबुद्धीने संविधानिक यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप आपचे पिंपरी चिंचवड प्रभारी व राज्य उपाध्यक्ष हरीभाऊ राठोड यांनी यावेळी केला.

आंदोलनात सहभागी आपच्या कार्यकर्त्यांनी ‘जेल के ताले टूटेंगे मनीष सिसोदिया छूटेंगे’-

‘केंद्र सरकार चा पोपट हा, लागला मिटू मिटू बोलायला’-  ईडी-सीबीआयच्या चुकीच्या कारवाया टळूदे-
‘आप’ ले राज्य येऊ दे’ ‘मोदी केजरीवाल से डरता हे’ सीबीआय को आगे करता हे. अशा जोरदार घोषणा देऊन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला.

दिल्लीतील आप सरकारच्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या प्रत्येक कामाला आडकाठी आणून त्रास देणाऱ्या भाजपने खोट्या-नाट्या गुन्ह्यामध्ये आपच्या नेत्यांना अडकवून जेल मध्ये टाकत आहे, आत्ताही दिल्लीच्या शिक्षणातील क्रांतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली असताना सूडबुद्धीने पेटलेल्या भाजपने सिसोदिया यांना अटक केली आहे. परंतु मनीष सिसोदिया यातून सहिसलामत सुटून येतील असा विश्वास प्रभारी हरीभाऊ राठोड यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपाने देशभरात राबवलेल्या अघोषित आणीबाणीचा समाचार घेत पिंपरी चिंचवड चे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले की मोदी आणि शहा हे विरोधकांना नाहक त्रास देण्यासाठी ईडी सीबीआय आणि आयकर विभागाकडून सातत्याने खोट्या प्रकरणामध्ये अडकवून छळ करत आहे. लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या भाजप सरकारला सडक ते संसद पर्यंत जन-चळवळ उभी करुन विरोध केला जाईल.

यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, यशवंत कांबळे, ब्रह्मानंद जाधव, गोविंद माळी, वाजिद शेख, अभिजीत सूर्यवंशी, संतोष इंगळे, सरोज कदम, मीनाताई जावळे, कमलेश रणवरे, अमर डोंगरे, हारून अन्सारी, यल्लाप्पा वालदोर, रोहित सरनोबत, चंद्रमणी जावळे, कुणाल वकटे, अय्याज सय्यद, शुभम यादव, इमरान खान, सुरेंद्र कांबळे, सुनील शिवशरण, राहुल वाघमारे, गोपाल पिल्ले, नंदू नारंग, महेश पाटील, वाहिब शेख, सोनाली झोल, मनोहर पाटील, दीपक श्रीवास्तव, व आपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.