उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिंचवडमध्ये उद्या करणार ‘शंखनाद’

0
72

शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार:

* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची पहिलीच प्रचार सभा

चिंचवड, दि. 05 (पीसीबी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी (दि. ६) काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील अँबियन्स हॉटेल शेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा संपन्न होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही या सभा होणार आहेत. या सभांचा शुभारंभ उद्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काळेवाडी फाटा येथील सभेतून होणार आहे.

या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.

शंकर जगताप यांच्या विजयासाठी थेरगाव ग्रामस्थांची ‘वज्रमूठ’

थेरगावच्या विकासाला चालना मिळावी यासाठी शंकर जगताप यांना साथ

शंकर जगताप यांच्या पदयात्रेला थेरगावकरांचा तुफान प्रतिसाद

चिंचवड : प्रतिनिधी, ३ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज थेरगाव येथील रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. चैतन्यदायी गीत, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी, त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आणि एकच नारा “शंकर जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या उल्हासित वातावरणात सळसळत्या तरुणाईची निघालेली उर्जावान पदयात्रेच्या माध्यमातून थेरगावकरांनी शंकर जगताप यांच्या विजयासाठी ‘वज्रमूठ’ बांधली आहे.

या पदयात्रेत महिला तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ महिलांनी औक्षण करीत, शंकर जगताप यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांना मनापासून विजयासाठी आशीर्वाद दिला. या अनोख्या स्वागताने शंकर जगताप भारावून गेले होते.

थेरगाव येथील पवना नगर पडवळ नगर, दगडू पाटील नगर, श्रीकृष्ण कॉलनी, ड्रायव्हर कॉलनी, हनुमान नगर, गुरुनानक कॉलनी, संदीप नगर, एकता कॉलनी, शिक्षक कॉलनी, नम्रता कॉलनी, साने गुरुजी शाळा, बापूजी बुवानगर, थेरगाव गावठाण परिसरात ही भव्य पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी निवडणूक प्रचारप्रमुख काळुराम बारणे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी नगरसेविका मनीषा पवार, तानाजी बारणे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, पिंपरी चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, प्रमोद पवार, विनोद पवार, शिवसेनेचे संभाजी बारणे, वृक्ष प्राधिकरण सदस्य विजय राऊत, दिगंबर पवार, किरण शिंदे, प्रतीक गाडे, युवा नेते अमोल जावळे, शिवसेना संघटिका रितूताई कांबळे, प्रकाश शिरगारे, डॉ. दत्ता देशमुख, हनुमंत बारणे, अतुल घोगरे, रवी भिलारे, सचिन वंजारे, किशोर पारखे, नाना शेंडगे, शंकर पवार, भूषण जावळे, रोहित सरोदे, प्रशांत वाघमारे, अमोल बागुल, प्रशांत सपकाळ, पियुषा पाटील, राजेश राजपुरोहित, अनिता नारळे, सागर बारणे, शुभम बारणे, शंकर खांडगे यांच्यासह इतर मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

*स्व. आमदार लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या आमदार निधीतून थेरगाव परिसरात कोट्यावधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओपन जिम, वाहतूक बेटांची निर्मिती व सुशोभीकरण, विविध ठिकाणी सार्वजनिक वाचनालय, पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या व्यासाची पाईपलाईन, 12 मीटरचा रस्ता विकसित करणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण या विकासकामांसह थेरगाव येथे बहुउद्देशीय इमारतीची उभारणी आदी कामे ही आमदार निधीमधून करण्यात आली आहेत. तसेच महापालिकेच्या रुग्णालयासाठीही स्व. लक्ष्मण जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता. या विकासकामांप्रमाणे भविष्यात थेरगावचा आणखी सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व थेरगावकरांनी शंकर जगताप यांच्या विजयाचा संकल्प केला आहे