‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार’

0
247

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज्याच्या सत्तासंघर्षाचा निर्णय अवघ्या काही तासांवर आलेला असतानाच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे. सत्तासंघर्ष निकालाच्या गोंधळात ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार’ अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सत्तासंघर्षावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदार अपात्र होऊन बाजूला जातील. राहिलेल्यांना भाजपसोबत मंत्रीपदाची संधी मिळून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान मोहिते पाटील यांनी यावेळी केलं. ‘भाजपला भविष्य लवकर कळतय’, असं म्हणत असा खोचक टोमणादेखील मोहिते पाटील यांनी भाजपला मारला.

यासोबतच, राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल काही वेळातच समोर येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड या निकालाचे वाचन करणार आहेत. नवीन पिढीला अपेक्षित निर्णय देतील अशी अपेक्षा आहे. देशातील राजकारण्यांना पाहिजे तसा निर्णय असू शकतो त्यामुळे हुकुमशाहीला छेद देणारा निकाल ठरणार असल्याचे मत दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलंय.