महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर येत आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.बारामती येथे लँडिंग करत असताना हे विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अपघातानंतर काही काळ एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात विमानाची राख रांगोळी झाल्याचे समोर येत आहे.अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.
सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मात्र विमानातील इतर प्रवासी किंवा कर्मचाऱ्यांबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घटनेनंतर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, नागरी विमान वाहतूक विभागाकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा धावपट्टीवरील अडथळा नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे, तसेच अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत दिलासा व्यक्त केला आहे.







































