तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ राष्ट्रवादीचा रोजगार मेळावा
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तब्बल ४२६ तरुणांना नोकरीची संधी – योगेश बहल यांचा उपक्रम यशस्वी
पिंपरी, दि. २४ – स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळाले. त्यामुळे पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, मा.नगरसेवक अजित गव्हाणे, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, शाम लांडे, फजल शेख, संजय वाबळे, वसंत बोराटे, अनुराधा गोफणे, जितेंद्र ननावरे, प्रकाश सोमवंशी, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, मायला खत्री, बबन गाढवे, शेखर काटे, वर्षा जगताप, चेतन दुधाळ, अक्षय माच्छरे, कविता खराडे, उज्वला ढोरे, मनीषा गटकळ, ज्योती गोफणे, शोभा पगारे, महेश झपके, संजय अवसरमल, श्रीकांत कदम, रवींद्र ओव्हाळ, गोरोबा गुजर, अकबर मुल्ला, रशीद सय्यद, देविदास गोफणे, संपत पाचुंदकर, भरत खरात, शक्रूला पठाण, माऊली मोरे, सतीश लांडगे, युवराज पवार, किरण ढेरे, रोहित कोळेकर, राहुल आडकर, वर्षा शिंदे आदि उपस्थित होते.
सुमारे ३५०० हजार बेरोजगारांनी या महोत्सवात सहभाग घेतला. २ हजार ८४२ हून अधिक पदवीधर युवकांनी ऑनलाईन मुलाखतींसाठी नोंदणी केली, तर १५८८ युवकांनी प्रत्यक्ष मेळाव्यात विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या आहेत. त्याद्वारे ४२६ पदवीधरांना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. बहुतांश उमेदवारांना ‘ऑफर लेटर’ उपलब्ध झाले आहेत. कंपनी व्यवस्थापनांकडून ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आगामी काळात होणार आहेत. विशेष म्हणजे काही उमेदवारांना दोन-दोन ऑफर भेटल्या आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार असून, ज्यांना संधी भेटली त्यांना ३६५ दिवस विविध ठिकाणी असलेल्या रोजगारांच्या संधी मोबाईलवर मिळणार आहेत व त्यांच्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने राज्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संत तुकारामनगर, पिंपरी येथे हॅप्पी स्ट्रीट -झुंबा कार्यक्रमाचे आयोजन दि.१३ जुलै २०२५ रोजी करण्यात आले होते, या कार्यक्रमामध्ये बालक, युवक युवती, तरूणंचा, जेष्ठ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला.
भव्य वृक्षारोपण – बी.डी.किल्लेदार उद्यान, स्वर्गीय राजेश बहल उद्यान येथे वृक्षारोपन करण्यात आले. आदरणीय अजितदादांच्या वाढदिपसानिमित्त २२ जुलै रोजी शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले, त्यामध्ये PWD मैदान या ठिकाणी चिंचवड विधानसभेतील सर्व पदाधिकारी यांच्यावतीने वृक्षारोपन शहराध्यक्ष योगेश बहल आणि विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, शेखर काटे, शाम जगताप, तानाजी जवळकर, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब पिल्लेवार,सतीष चोरमले,उदय ववले स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. काळेवाडी परिसरात मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत मा.नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, मा.नगरसेविका उषा काळे, संगीता कोकणे, भव्य वृक्षारोपन करण्यात आले. पिंपळेनिलख येथे उपाध्यक्ष शिरिष साठे यांच्या वतीने देखील मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपन करण्यात आले. इद्रायणीनगर, भोसरी सी सेक्टर याठिकाणी श्री.अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत मा.नगरसेवक संजय वाबळे आणि प्रकाश सोमवशी यांच्याकडून ६५ झाडे लावण्यात आली. मा.नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यावतीने इंदीरानगर परिसरात ६५ झाडे लावण्यात आली. नाना काटे सोशल फाउंडेशन तसेच उमेश काटे युथ फाउंडेशनच्यावतीने पिंपळेसौदागर पुल येथे वृक्षारोपन करण्यात आले. मातृ विद्यालय वाल्हेकरवाडी येथे मा.नगरसेवक राजेंद्र साळुंके यांच्यावतीने ६५ देशी वृक्षांचे रोपन करण्यात आले. मा.महापौर मोहंम्मद पानसरे तसेच मा.नगरसेविका अमिना पानसरे यांच्यावतीने एच ए शाळा परिसरात भव्य वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर उपक्रमास शालेक विद्यांर्थी यांचा देखील प्रतिसाद पाहावयास मिळाला.
विविध स्पर्धा
कॅरम स्पर्धा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयोजित श्री अजितदादा पवार व श्री योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रथम जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धा सदर स्पर्धेत एकूण १३६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता, ३ ब्रेक टू फिनिश झाले. यावेळी माजी महापौर व शहराध्यक्ष योगेश बहल, शिक्षण मंडळ माजी सभापती फजल शेख ,माजी उपसभापती शिक्षण मंडळ मायला खत्री, सुशिल गुजर सेक्रेटरी, सदस्य श्री अविनाश कदम, हरपीत सिंग, राजेश दिक्षित, आंतर राष्ट्रीय पंच राम पडगीळ, सहपंच विष्णू भुते, अमोल चव्हाण, सचिन पिंगळे, मुकेश इंगूळकर, विनोद देसाई, अनंत भुते हे उपस्थित होते.
कॅरम स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
दिनांक १९ ते २० जुलै २०२५
प्रथम-रहीम खान, द्वितीय- निकुल काकडे,तृतीय-अभिजित त्रिपणकर,चतुर्थ-योगेश परदेशी,पाचवा-अनिल मुंढे,सहावा-गणेश तावरे,सातवा-अनुराग दुबळे,आठवा-हरून शेख.
बुद्धिबळ स्पर्धा
दुसरी फिशर रँडम ( चेस ९६० ) व वयोगटातील पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धा —
खुल्या गटात आदित्य जोशीला विजेतेपद. ..
मा.अजितदादा पवार ( उपमुख्यमंत्री ) आणि मा.योगेशजी बहल ( माजी महापौर ,पिंपरी -चिंचवड ) यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. राजेश बहल स्पोर्ट्स व सोशल फाउंडेशन व योगेश बहल मित्रपरिवार यांनी पिंपरी चिंचवड महानगर चेस असोसिएशनच्या सहकार्याने घेतलेली बुद्धिबळ स्पर्धा काल भोसरी येथे संपन्न झाली. पुणे जिल्ह्यतील एकूण ३१० खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गटात स्विस लीग पद्धतीने ७ फेऱ्या खेळवण्यात आल्या.
दरम्यान मा.श्री.योगेशजी बहल व मा.श्री.विलासजी लांडे यांनी पटावर चाल करुन स्पर्धेचे औपचारिकरीत्या उद्घाटन केले. त्याप्रसंगी अजित गव्हाणे, संजय वाबळे, राहुल भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
खुल्या गटात ७ व्या फेरी अखेर चिंचवडचा आदित्य जोशी व पुणे शहराचा अविरत चौहान ह्यांचे समान साडेसहा गुण झाले. टायब्रेक गुणांनुसार आदित्यला विजेतेपद मिळाले व अविरत उपविजेता ठरला. आदित्यला विजेतेपदाचा चषक व रुपये ७०००/- रोख बक्षीस मिळाले. तसेच अविरतला चषक व ६०००/- रुपयाचे पारितोषिक मिळाले. आद्विक अग्रवाल आणि गौरव बाकलीवाल यांचे सामान साडेसहा गुण झाले. टायब्रेक गुणानुसर अद्विकला तृतीय व गौरवला चतुर्थ स्थान प्राप्त झाले. भुवन शितोळे ,साहिल सेजल , विकास शर्मा, अक्षय जोगळेकर, अर्णव कदम व अपूर्व देशमुख यांनी अनुक्रमे ५ ते १० क्रमांकाचे यश प्राप्त केले.
या गटातील उत्तेजनार्थ पारितोषिके खालील प्रमाणे —–
सर्वोत्कृष्ट बिगर मानांकित खेळाडू ..
प्रथम-चंद्रकांत बाभूळगावकर (४.५ गुण ), द्वितीय-सचिन जाधव (४), तृतीय-संतोष कर्णावत (३.५)
सर्वोत्कृष्ट पिं चि खेळाडू
प्रथम-अलौकिक सिन्हा (४.५ गुण ), द्वितीय-धनंजय नागरगोजे (४), तृतीय- श्रेयस पाटील (४)
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू-
प्रथम-श्रावणी उंडाळे (५ गुण ), द्वितीय-आदिती व्हावळ (४), तृतीय-सम्रुद्धि मक्तेदार (३)
सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू
प्रथम-सुनील वैद्य (४ गुण ), द्वितीय-सुहास कामतेकर (३), तृतीय-व्यासमूर्ती के. (२)
वयोगटातील पहिले तीन खेळाडू खालील प्रमाणे…
१५ वर्षांखालील खुला गट ..
प्रथम . .सई पाटील (६ गुण ), द्वितीय. .केविन माथियाझगन (५.५ ), तृतीय . .शार्वि बाकलीवाल (५)
मुली ..
प्रथम. .गेहेना शिंगवी (४.५), द्वितीय. .जिजा गायकवाड (२), तृतीय . .श्रावणी देशमुख (२)
१३ वर्षांखालील खुला गट ..
प्रथम. .ओम रामगुडे ( ६.५ गुण ), द्वितीय. .अनमोल केलवानी ( ६) , तृतीय. .इताश डोडान्नवार (६)
मुली ..
प्रथम. .अर्णा सिंग (५ गुण ), द्वितीय. .ट्विंकल दासगुप्ता (४.५), तृतीय. .पूर्वा कदम ( ४)
११ वर्षांखालील खुला गट ..
प्रथम. .श्रीयांश सुहाने ( ६.५ गुण ), द्वितीय. .दर्श उदागिरी (५.५), तृतीय. .तनिष गावकर (५.५)
मुली ..
प्रथम. .सान्वि महाडिक (५.५ गुण ), द्वितीय. .आज्ञा काटकर (५), तृतीय. .स्पृहा कमलापुरकर (४.५)
९ वर्षाखालील – खुला गट
प्रथम – विहान शहा( 7गुण), द्वितीय – केविन दीक्षित(6 गुण) , तृतीय- विहान निगम (5.5 गुण)
मुली – 1) शौर्या शिंदे 2)आराध्या गरुड 3) दुर्वा निकम
७ वर्षाखालील – खुला गट
प्रथम – अनिरुद्ध नगरकर(5.5 गुण), द्वितीय – श्लोक अहुजा (5 गुण), तृतीय – अन्वीत बोरगावे (5 गुण )
मुली – 1)ऋणवी रणदिवे 2) पाखी पटेल 3) तनिष्का जैन
सर्व गटात मिळून विजेत्या खेळांडूना एकूण रु 80000 रोख, 43 सन्मानचिन्हे व 99 पदके प्रदान करण्यात आली.
बक्षीस वितरण शहराध्यक्ष योगेश बहल व संजय वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विवेक भागवत आभारप्रदर्शन सौ मनीषा भागवत व सूत्रसंचालन वर्षा जगताप यांनी केले.त्याप्रसंगी विकास देशपांडे हे हजर होते.
विषेश सहकार्य हरप्रीत सिंग, गिरीश वाघमारे, धनाजी तांबे, प्रल्हाद जाधव व अरविंद भुसारे यांनी केले, प्रमुख पंच म्हणून शशिकांत मक्तेदार यांनी काम पाहिले.
रक्तदान शिबीर –
महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदार संघात १) पिंपळे सौदागर येथील शंभो महादेव मंदीरात नाना काटे सोशल फाउंडेशन व उमेश काटे युथ फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, येथे १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. २) नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरामध्ये शराध्यक्ष योगेश बहल, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती मा.अध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, शाम जगताप, तानाजी जवळकर, सुषमा तनपुरे, उज्वला ढोरे, तृप्ती जवळकर, यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
३)रहाटणी येथे युवानेते सागर कोकणे, चंद्रकांत तापकिर, अश्विनी तापकिर, सुमित डोळस यांच्यावीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले यात ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. ४) थेरगाव परिसरात ग्रामदैवत बापूजी बुवा मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन मा.नगरसेवक कैलास बारणे, गोरक्षनाथ पाषाणकर, संभाजी बारणे, युवा नेते प्रशांत सपकाळ, विशाल पवार, शरद बारणे यांनी केले, नागरिक, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला येथे २१५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दंत तपासणी शिबीर –
सौ.विजया काटे यांच्यामार्फत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यात जेष्ठ नागरिकांचा सह महिलांनी देखील आपली तपासणी करुन घेतली.
चित्रकला स्पर्धा व इ.१० वी व १२ वी गुणवंताचा सत्कार समारंभ –
प्रेरणा माध्यमिक विद्यालय, वाल्हेकरवाडी, येथे विद्यार्थ्यानकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन मा.सभापती श्रीधर वाल्हेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक आगम सर सहकार सेल चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, स्पर्धेत सहभागी व निवड झालेल्या विद्यर्थ्यांचा आकर्षक पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
थेरगाव परिसरातील इ.१० वी व इ.१२ वी मधील गुणवंताचा सत्कार समारंभ तसेच खाजगी व प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये संयुक्त चित्रकला स्पेर्धेचे आयोजन शहर कार्याध्यक्ष संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांच्यावतीने घेण्यात आले व त्यांचा गुण गौरव विषेश पारितोषिक देऊन करण्यात आला.
शालेय वस्तूंचे वाटप –
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा, संत तुकारामनगर येथे आदरणीय अजितदादा पवार तसेच योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी शालेय साहित्य वही वाटप तसेच शिक्षक सेवकांचा सन्मानचा करण्यात आला.
वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे यांच्या वाहतूक विभागाच्यावतीने मोफत पीयुसी, महिलांकरिता कार ट्रेनिंग विथ लायसन्स, टू व्हीलर लायसन्स अल्प दरात उपलब्ध कार्यक्रम घेण्यात आल यात अनेक महिलांनी सहभाग नोंदविला.
असे विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे अजित दादांचा वाढदिवस स्वयंपूर्ण उत्साहात साजरा करण्यात आला