एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र आणि ओडिसा राज्यातील संस्कृतीचे होणार दर्शन
पिंपरी,दि. 20 पीसीबी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र व ओडिसा या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा “लोकोत्सव” चे उद्घाटन गुरुवारी (दि. २०) उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ होणार आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे समन्वयक पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे प्रवीण तुपे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या लोकोत्सव अंतर्गत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता, भक्ती परंपरेचा भक्ती उत्सव, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता, आदिवासी संस्कृतीचा आदिवासी कला उत्सव आणि शनिवारी सायंकाळी पाच वाजता समारोपाच्या दिवशी लोकसंस्कृतीचा लोकोत्सव असे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर, उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, महेश लांडगे, राहुल कुल, बाबाजी काळे, अण्णा बनसोडे, ज्ञानेश्वर कटके, सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, चेतन तुपे, सुनील कांबळे, विजय शिवतारे, शरद सोनवणे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर जगताप आदी मान्यवरांसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह हे देखील उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक विभाग विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.