उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार बनसोडेसाठी शिष्टाई

0
117

मुंबई, दि. १५ – शहरातील राजकारणात आज मोठा ट्विस्ट आला. पिंपरी राखीव मतदारसंघातील महायुतीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अत्यंत निष्क्रिय कारकिर्दीमुळे वारंवार विरोध कऱणाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळकळीची विनंती केल्याने पाठिंबा दिला. दरम्यान, युवा नेते पार्थ पवार यांनी गुरुवारी तब्बल दोन तास पिंपरी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा केली. शहराध्यक्ष योगेश बहल यांना कोणी दादा देत नसल्याने अखेर अजितदादांनाच शिष्टाई करावी लागली.

आमदार बनसोडे कोणाशी संपर्क करत नाहीत, ते अकार्यक्षम आहेत, दहा वर्षांत एकही काम केलेले नाही, विधीमंडळात तोंड उघडले नाही, कार्यकर्ते आणि मतदारांनी कधीच उपलब्ध नसतात अशी शेकडो तक्रारी आल्या होत्या. पिंपरीतील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनेने त्याबाबत कठोर भूमिका घेतली होती. स्वतः श्रीचं आसवाणी, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी तसेच पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह २७ माजी नगरसेवकांनी आमदार बनसोडे यांच्या उमेदारीला विरोध केला होता. बनसोडे यांनाच उमेदवारी मिळाल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
दरम्यान, पार्थ पवार यांनी सर्व सूत्र हातात घेतली आणि एका एकाची समजूत काढली. त्यानंतर बहल यांच्यासह काळुराम पवार, जितेंद्र ननावरे यांनी माघार घेतली. पार्थ पवार हे सलग आठवडाभर शहरात तळ ठोकून आहेत. गुरुवारी त्यांनी आसवाणी यांच्या निवासस्थानी स्वतंत्रपणे भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही माघार घ्या आणि बनसोडे यांच्या बरोबर सक्रीय होण्यासाठी त्यांनी खूप आग्रह केला. दोन तास चर्चा सुरू होती. आमदाराने कधी व्यापाऱ्यांचे काम केले नाही, उलट त्रास दिला, असे आसवाणी यांनी काही उदाहरणांसह स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आसवाणी यांना आज सकाळी मुंबई येथे बोलावून घेतले. त्यांच्या समवेत योगेश बहल, डब्बू आसवाणी, काळुराम पवार, चेतन घुले, प्रसाद शेट्टी, भाजपचे शितल शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत स्वतः अजित पवार यांनी आसवाणी बंधुंना ग्वाही दिली.