उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अभिष्टचिंतन

0
79

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई, दि. 22 जुलै (पीसीबी) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर अभिष्टचिंतनांचा वर्षाव होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच अजित पवार यांना दूरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनीही अमित शहा यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.