उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ४०० वृक्षांची लागवड

0
281

राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार व लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार यांचा उपक्रम

धारूर,दि.२३(पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त चिंचवडविधानसभा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अरुण (बापू) पवार व लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी (काका) पवार यांच्या माध्यमातून गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते मौजे धारूर या ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीच्या ४०० रोपांचे वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी धारूर गावाचे लोकनियुक्त सरपंच मा.बालाजी (काका) पवार बोलताना वृक्ष आपल्या जीवनात सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका निभावतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. त्याच बरोबर झाडांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे जतन केले पाहिजे.आपणा सर्वांना मिळून झाडे लावून,झाडे जागवून आपल्या भरत भूमीला सुजलाम सुफलाम सश्य श्यामलाम बनवले पाहिजे.वृक्षारोपन बद्दल नागरिकामध्ये जनजागृती केली व धारूर गावामध्ये करंज ,चिंच , आवळा , वड , पिंपळ , कडुलिंब अशा प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी गावातील अरुण बापू पवार विचार मंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम कदम, बालाजी गुरव,दत्ता शिंदे, सोमनाथ कोरे, विशाल पवार, प्रदीप कदम, ग्रा. सदस्य धारूर, विठ्ठल पाटील, विजय पवार, महेश गुरव,बापू गायकवाड, कुंडलिक वाघमारे अनिल शिंदे,गोरोबा जगताप,बंडू खांडेकर,दत्ता खांडेकर,उमेश पवार सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.