उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फायर बाईक, पोलीस बाईकसह इतर कार्यक्रमाचे उद्घाटन

0
429

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिवसभर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असून विविध विकासकामांच उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रांगणात फायटर फायर बाईक, पोलीस बाईकसह इतर कार्यक्रमाचे उद्घाटन होते. ७.३० ची वेळ असताना अजित पावर हे ठीक सात वाजता पालिकेत पोहचले. चौथ्या मजल्यावर त्यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

महानगरपालिका इमारतीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या उद्घाटनला अजित पवार इमारतीच्या खाली आले. यावेळी फायर फायटर बाईक, पोलीस बाईकचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.