उपमुख्यमंत्री अजितदादांच्या काका शरद पवारांना ट्विटरवर शुभेच्छा

0
39

बारामती, दि. 12 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी 85वा वाढदिवस आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते म्हणून शरद पवारांनी राजकीय वर्तुळात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. भारतातील सर्वाधिक संसदीय कारकिर्द असलेले नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. गेल्या 50 पेक्षा जास्त काळ ते राजकारणात सक्रीय आहेत. शरद पवारांनी अनेक मंत्रि‍पदावर काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्रि‍पदावर काम केले आहे. तसेच शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे अजित पवारांनी म्हटले आहे.