– झी २४ तास च्या घणाघाती मुलाखतीत राज ठाकरे यांची कडवट टीका
मुंबई, दि. २४ (पीसीबी) : राज्यात सुरु असलेल्या राजकीय गदारोळावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी चौफेर टीका केली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत ४० आमदार गेले. या विरोधात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे गट हा मनसेमध्ये विलीन होऊ शकतो, अशी चर्चा सुरु होती. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. शिंदे गटाचे ४० आमदार मनसेमध्ये आले तर तुम्ही त्यांना पक्षात घ्याल का, असे विचारले असता, राज म्हणाले मी त्यावर विचार करेल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, 2014 आणि 2017 मध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता? असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे विश्वास ठेवण्यासारखे नाही. बाकीच्या लोकांचे मला वाईट वाटते मात्र, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही” अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
शिवसेनेमध्ये फुट बघायला मिळतात आहे, अशा परिस्थितीमध्ये जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती का? यावर राज ठाकरे म्हणाले, शक्यच नाही, याच कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचाराने बांधली गेलेली माणसे होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता. त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसे होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राऊतांमुळे आमदार फुटले नाहीत –
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन स्वतंत्र गट केला. त्यानंतर संजय राऊतांच्या निशाण्यावर शिंदे गटातील आमदार होते. हे सर्व आमदार गुवाहाटी असताना राऊतांनी एका जाहीर सभेत त्यांना रेडा म्हणून संबोधले होते. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतरही एक-एक आमदार शिंदे गटात सामील होत होते. ‘राऊतांच्या विधानामुळे शिवसेना फुटली, त्यांच्यावर अनेक आमदार नाराज होते,’ असे बोललं जाते, पण याबाबत राज ठाकरेंना शिवसेनेना कुणामुळे फुटली असे विचारले असता त्यांनी त्यांचे श्रेय त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले. तर शिवसेना फुटीमागे राऊत जबाबदार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. “जी गोष्ट घडली त्यांचे श्रेय उद्धव ठाकरेंना द्यावे लागेल,” असे सांगत राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
राज ठाकरे म्हणाले, “बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले, त्यांच्यावर हल्लाबोल केला. पण शिवसेना फुटली याला संजय राऊत जबाबदार नाही, मी समजू शकतो ते सकाळी टीव्हीवर येतात,त्यांची ती स्टाईल, त्यांचा तो अहंकार, यामुळे माणसं वैतागली, राऊत रोज तेच तेच बोलतात, असे लोकही म्हणू लागले. पण ते तेवढ्यापूरतं होतं, राऊतांमुळे आमदार फुटले नाहीत, त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंना आहे,”
४० आमदार मनसेमध्ये आल्यास –