उध्दव ठाकरेंनी, झुकेगा नहीं साला घुसेंगा असं म्हटलं होतं …

0
224

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – उध्दव ठाकरेंच्या फडतूस टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी माझा उल्लेख फडतूस असा केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं, झुकेगा नहीं साला घुसेंगा असं म्हटलं होतं. आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस, बावनकुळेंच्या टीकेवर कठोर शब्दांत निशाणा साधला. राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने तर या सरकारला नपुंसक म्हटलं. पण उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला अत्यंत सौम्य शब्दात फडतूस म्हटलं. फडतूसचा अर्थ बेकार, अर्थहीन, युजलेस आणि बिनकामाचे असा होतो.

पण तुम्ही स्वत:ला काय काडतूस म्हणता. तुम्ही तर भिजलेलं काडतूस आहात. हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं आहे अशी टीका राऊतांनी यावेळी केली. तसेच तुमचं खरं काडतूस तर सीबीआय आणि ईडी आहे. म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे. ही ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या. मग काडतूस कुठं घुसतं ते आम्ही दाखवतो, असं आव्हानही राऊत यांनी दिलं फडणवीसांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांसह सरकारमधील सगळेच मिस्टर झुके आहेत. तुम्ही झुकलेला आहात. वाकलेला आहेत. ज्याला दोन शब्द नीट वाचता येत नाही. बोलता येत नाही. त्यांच्या नेतृत्वात मी काम करतो असं अभिमानाने म्हणतात त्याला झुकणं नाही म्हणत का? असा सवाल करतानाच मिस्टर फडणवीस तुम्ही झुकेच आहात, अशी टीकाही राऊत यांनी केली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याच्या आरोपांखील अटक करण्यात आली आहे. याचप्रकरणावरुन संजय राऊतांनी भाजपवर टोला लगावला आहे. डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील. ट्रम्प यांचं ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये टाकून स्वच्छ होतील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री करावी असं म्हणत सामनातून भाजप(BJP) वर हल्लाबोल चढवला आहे.