उधारी मागितल्याने टपरीत तोडफोड

0
245

पुनावळे, दि. २० (पीसीबी) – उधारीचे पैसे मागितल्याने चार जणांनी टपरीमध्ये तोडफोड केली. त्यानंतर टपरी मधून दोन हजार 400 रुपये जबरदस्तीने काढून नेले. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी पुनावळे माळवाडी येथे घडली.

सुनिलसिंग नंदकुमारसिंग राजपूत (वय 38, रा. पुनावळे. मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/जेआर 7659 कारमधून आलेल्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुनावळे माळवाडी येथे पान टपरी आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता ते टपरीवर असताना आरोपी कारमधून आले. फिर्यादीकडे आरोपींनी सिगारेट आणि पाण्याची बाटली मागितली. परंतु आरोपीकडे मागील उधारीचे पैसे बाकी असल्याचे ते पैसे देण्याची फिर्यादींनी मागणी केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या टपरीमधील चॉकलेट, गोळ्या ठेवलेल्या बरण्या तोडून फोडून शिवीगाळ, दमदाटी केली. टपरी मधील गल्ल्यात हात घालून दोन हजार 400 रुपये काढून घेऊन निघून गेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.