उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी क्यूसीएफआय पुणे च्या वतीने ‘टीक्यूएम स्पर्धा 2024’ संपन्न

0
69

चिंचवड, २४ जुलै (पीसीबी) – टीक्यूएम हा एक व्यवस्थापन दृष्टिकोन आहे जो ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांची गुणवत्ता सतत सुधारण्यावर केंद्रित आहे. यात प्रक्रिया, उत्पादने, सेवा आणि संस्थेची संस्कृती सुधारण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांचा सहभाग असतो. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे यांनी टीक्यूएम स्पर्धा 2024 सदर स्पर्धेचे आयोजन क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात 40 संस्थांचे 370 स्पर्धक सहभागी झाले होते. केस स्टडी, स्लोगन अँड पोस्टर या विभागात एकूण 154 नामांकने प्राप्त झाली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कॅप्रिहान्स इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जितेंद्र उपाध्याय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. समारोप सत्राचे अतिथी म्हणून अजय सिंग प्लांट हेड टीई कनेक्टिव्हिटी, शिरवळ उपस्थित होते.
पुणे चॅप्टर कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर, परवीन तरफदार, क्यूसीएफआयचे मानद अध्यक्ष सतीश काळोखे उपस्थित होते.

संपन्न झालेल्या स्पर्धेत अश्विनी निमकर, विनय पाटील, रणजित जाधव, हनुमंत बनकर, संतोष कुमार, गिरीश मिस्त्री, निखिल सोनटक्के, महिंद्र मगदूम यांनी केस स्टडी प्रेझेंटेशनचे मूल्यमापन केले.तर; स्लोगन व पोस्टरचे मूल्यमापन अनंत क्षीरसागर व परवीन तरफदार यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी तर; कार्यक्रमाचे नियोजन रहीम मिर्झाबेग, प्रशांत बोराटे व क्यूसीएफआय पुणे चॅप्टरचे चंद्रशेखर रुमाले यांनी केले.

स्पर्धेतील सहभागी कंपन्या ः-
अभिजीत डायज अँड टूल्स इंडिया प्रा.लि.-पालघर, अभिजीत इंडस्ट्रीज दादरा आणि नगर-हवेली, अभिजीत प्लॅस्टिक इंडिया प्रा.लि., चाकण, अभिजीत टेक्नो प्लास्ट इंडिया प्रा.लि.-नाशिक, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंब्लीज लि.-(एएसएएल), बेलराईज इंडस्ट्रीज लि.-रांजणगाव, कॅप्रिहान्स इंडिया लि., क्लोराइड मेटल्स लि.-सुपा, कमिन्स टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.-पीसीपी-1, कमिन्स टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.-पीसीपी-2, फोर्ब्स मार्शल, फोर्ब्स विंके प्रा.लि-कासारवाडी, गॅब्रिएल इंडिया-चाकण, जीई इंडिया इंडस्ट्रियल प्रा.लि., हायटेक इंजिनीअर्स लि.-शिरवळ, आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा., लीअर ऑटोमोटिव्ह इंडिया लि., मरेली मदरसन ऑटो सस्पेंशन पार्ट्स प्रा., मिंडा कॉर्पोरेशन लि. (वायरिंग हार्नेस डिव्हिजन-1), मिंडा कॉर्पोरेशन लि. (वायरिंग हार्नेस डिव्हिजन 2), मिंडा इंस्ट्रूमेंट्स लि., नील मेटल प्रॉडक्ट्स लि., क्यूएच टॅलब्रोस प्रा.लि.-खंडाळा, रामरत्न इन्फ्रास्ट्रक्चर प्रा., एसएफएस ग्रुप इंडिया प्रा., एसआयएसी एसकेएच इंडिया कॅब्स मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि., एसकेएच एम इंडिया प्रा.लि., एसएमएआर ऑटोमोटिव्ह प्रॉडक्ट्स इंडिया प्रा., सुजान कॉन्टीटेक एव्हीएस प्रा.लि., सनफ्रेश अ‍ॅग्रो इंडिया प्रा.लि., सुप्रीम नॉनवेव्हन इंडस्ट्रीज प्रा.लि., सुप्रीम ट्रेऑन इंडस्ट्रीज प्रा., टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स लि., टाटा ऑटोकॉम्प (इंटिरियर प्लास्टिक डायव्ह.), टाटा ग्रीन जीवाय बॅटरी, टाटा मोटर्स ट्रक प्लांट, टीई कनेक्टिव्हिटी-शिरवळ, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लि.-शिरवळ, व्हीओएसएस ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि., झेडएफ इंडिया प्रायव्हेट लि.