उद्योगनगरीत कामगारदिनी दुचाकी रॅली

0
3

पिंपरी, दि. २९ – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने कामगारदिनानिमित्त येत्या गुरूवारी (दि.१) सर्व कष्टकरी, कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गुरुवारी दि. ०१ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता दापोडीतील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यापासून, मुंबई पुणे महामार्गाने सरळ, निगडी येथील भक्तिशक्ती पुतळ्यासमोरील चौकात या रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष कैलास कदम, मुकेश तिगोटे, बाबासाहेब चव्हाण, मनोहर गडेकर, अनिल आवटी, विष्णूपंत नेवाळे, राजेंद्र खराडे, सुनिल देसाई, शशिकांत थुमाळ, किशोर घडियार, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, नसिरूद्दीन इनामदार, कुमार मारणे, चेतन आगरवाल, तुषार पाटील, किशोर मारणे, सोपान भोसले, केनिथ रेमी, दिपक निनारीया, सुनिल भालेकर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, किरण भुजबळ, विठ्ठल गुंडाळ, संतोष खेडकर, विलास शिर्के, आदी कामगार नेते उपस्थित राहणार आहेत.