उद्या निगडीत मातृशक्तीचा भव्य मेळावा

0
95
  • दांडिया स्पर्धेचे आयोजन
  • अभिनेते राहुल सोलापूरकरांची विशेष उपस्थिती

निगडी प्राधिकरण दि.२१ (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड मातृशक्ती तर्फे शहरातील महिलांसाठी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि.२२ ऑक्टोबर रोजी निगडी प्राधिकरण सेक्टर २५ येथील स्वातंत्रवीर सावरकर मंडळात सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जेष्ठ सिने अभिनेते व सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल सोलापूरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सजग रहो उपक्रमांतर्गत अंतर्गत राष्ट्रहित व हिंदुत्वासाठी महिलांचे योगदान या विषयावर ते हितगुज करणार आहेत. दांडिया स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण सोहळा देखील यावेळी होणार आहे. या कार्यक्रमात परिसरातील जास्तीत जास्त मातृ शक्ती ने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.