उद्या ताथवडे मध्ये अविनाश धर्माधिकारी यांचे तरुणांसाठी विशेष व्याख्यान

0
53

चिंचवड दि.१३ (प्रतिनिधी)

भारताचे भविष्य असणाऱ्या तरुण तरुणींसाठी इंड जिनियस (IND Genius) तर्फे उद्या गुरुवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ(SBUP)येथे करण्यात आले आहे.

‘युवा – विकसित भारताचे शक्ती केंद्र ‘ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते, शिक्षणतज्ञ, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन व संवाद साधणार असून शहरातील सर्व महाविद्यालयातील १८ ते २५ वयोगटातील सर्व तरुण तरुणींनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. वर दिलेला QR कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी करून व्याख्यानाची प्रवेशिका मिळणार आहे.