पिंपरी दि. 22 (पीसीबी) – शिवसेनेतून 40 आमदार आणि 12 खासदार शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्षातून निघून गेले आहेत. उरलेली शिवसेना देखील त्यांच्या हातातून निसटत चालली आहे. अस्तित्व दाखविण्यासाठीच ठाकरे प्रक्षोभक भाषण करत असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहिले तर शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गट शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत चिंचवडमध्ये बोलताना मंत्री महाजन म्हणाले, 40 आमदार आणि 12 खासदार त्यांच्या पक्षातून निघून गेले आहेत. उरलेली शिवसेना देखील त्यांच्या हातातून निसटत चालली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लोक दिसत आहेत. एका महिन्यात निवडणुका घ्या हे शक्य आहे का? उद्धव ठाकरे हे अस्वस्थ आहेत. कालच्या मेळाव्याच्या भाषणात ते भडक बोलत होते. लोकांना अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. त्यांच्याकडे काहीच राहीले नाही.
वेदातांने पत्र देऊन ही महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नाही. वायनरीच्या बाबत मिटिंग घेतली, पण वेदांताच्या बाबत मिटिंग घेतली का? कोणाला बोलावले का? त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना तुम्ही रेड कारपेट टाकले का? असा विविध प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली.