मुंबई, दि. २८ (पीसीबी) – उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. अशी मागणी भाजपने ट्विट करत केली आहे. तसेच या वादासंदर्भात ट्विटची मालिका शेअर मोठा खुलासा केला आहे. वेदांता नंतर टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलं आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, भाजपने ट्विट करत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच ‘एअरबस टाटा’ गुजरातमध्ये गेली. असा आरोप भाजपने केला आहे. तसेच, भाजपने ट्विटची मालिका शेअर करत या प्रोजेक्टबद्दल मोठा खुलासा केला आहे.