उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किंती जागा मिळतील, सुषमा अंधारे यांनी सांगितले सत्य

0
239

लोकसभा निवडणुकीचा उत्सव देशभरात सुरु आहे. पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. तर पुढचा टप्पा २६ एप्रिलला पार पडणार आहे. अशात प्रचारसभांचा जोर सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळेल असं म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंची शिवसेना किती जागा जिंकेल हे देखील सांगितलं आहे.“महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी शिवसेना आणि उद्धव ठाकरे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १३ किंवा त्याहून जास्त जागा मिळतील असा मला विश्वास आहे.” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

मी संसद अभ्यासली, विधीमंडळाचा अभ्यास केला. पूर्वीसारखी भाषणं, अभ्यास लुप्त झाला आहे. आता फक्त शिवराळपणा उरला आहे. तसंच संजय राऊत यांचं नवनीत राणांबाबतचं वक्तव्य मी जेव्हा मोबाइलवर पाहिलं तेव्हा मला राहत इंदौरींची कविताही सापडली, बुलाती है मगर जाने का नहीं असं म्हणत सुषमा अंधारेंनी त्या वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात सुषमा अंधारेंनी हे वक्तव्य केलं.

सुषमा अंधारे म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांनी माझ्यामुळे शिवसेना सोडली नाही, त्यांना त्यांची खुर्ची वाचवायची होती. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी आमच्याकडची संख्या कमी होती. अशा वेळी त्यांना त्यांची जागा सुरक्षित करण्यासाठी तिकडे जाणं महत्वाचं होतं त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला. अजित पवार अशावेळी निंबाळकरांना तिथे बसवू शकत होते. फडणवीसांना ते मान्य नव्हते. त्यानंतर मग नीलम गोऱ्हे तिकडे शिफ्ट झाल्या. आमदारकी ,खासदारकी पेक्षा मी माझा सेल्फ रिस्पेक्ट ठेवणाऱ्या लोकांपैकी आहे. माझं काही काम करायचं असेल आणि मी मेसेज टाकला तर शिवसेनेकडून दोन तासांत ते काम होतं असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.