उद्धव ठाकरेंकडून राहुल कलाटेंची मनधरणी

0
278

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – शिवसेनेचे उपनेते सचिन अहीर यांनी आज चिंचवड उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करत अर्ज मागे अशी विनंती केली. यासंदर्भात शिवसेना पक्षअध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही कलाटे यांच्याशी संवाद साधला असल्याची माहिती अहीर यांनी दिली आहे.

दरम्यान, या संदर्भात सचिन आहेर म्हणाले, कलाटे यांच्याबरोबर आम्ही सविस्तर बोललो. समजूत काढण्याता प्रयत्न केला. मागे २०१९ मध्ये कलाटे यांना १ लाख १२ हजार मते मिळाल्याचा उल्लेख होतो, पण त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा होता. आता यावेळी ती परिस्थिती असेलच असे नाही. आता दुपारी तीन पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. कलाटे हे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बोलणार आहेत.

दरम्यान, कलाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी आज सचिन आहेर यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांनी उध्दव साहेबांशी फोन जोडून दिला, मी साहेबांशी बोललो, मला त्यांचा अनादर करायचा नाही. आता मी कार्यकर्त्यांशी बोलतो आणि नंतर कळवतो, असे त्यांनी सांगितले.